Ad will apear here
Next
‘गोगटे-जोगळेकर’मध्ये तीन ऑगस्टला ‘मैत्र’चे आयोजन
मैत्रीच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नामवंत मंडळी साधणार एकमेकांशी संवाद
रत्नागिरी : चतुरंग प्रतिष्ठान आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मैत्र’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत महाविद्यालयातील राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.

हा कार्यक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीच असून, जागेअभावी सहभागींच्या संख्येवर मर्यादा पडणार आहे. पूर्णतः विनामूल्य प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाच्या प्रवेशिका डिपॉझिट पद्धतीने २३ ते २५ जुलैदरम्यान सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच राधाबाई शेट्ये सभागृहाच्या प्रवेशद्वारी वितरीत केल्या जाणार आहेत. या विशेष कायर्क्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार असून, नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र बरोबर ठेवणे आवश्यक आहे. 

‘मैत्र’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीतकार अशोक पत्की, संगणकतज्ज्ञ व संगीततज्ज्ञ अच्युत गोडबोले, दिग्दर्शक-अभिनेता आलोक राजवाडे, पत्रकार आणि संवादक-मुलाखतकार सुधीर गाडगीळ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोर्ट्रेट पेंटर सुहास बहुळकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रसाद देवधर, नृत्यांगना आणि नृत्यगुरू सोनिया परचुरे आणि कोकणातील प्रथितयश चित्रकार अरुण दाभोलकर यांची उपस्थिती लाभणार आहे. या ‘मैत्र’ मेळाव्यात मान्यवरांसोबत थेट भेटीची, आमने-सामने गप्पागोष्टी करण्याची, तसेच  त्यांच्याबरोबर चहापान करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थी आणि नामवंत मंडळींमध्ये घडणाऱ्या मनमोकळ्या प्रश्नोत्तरांतून, गप्पागोष्टींतून ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने त्यांच्यात नवे ‘मैत्र’ जडावे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.

या संदर्भातील अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या नोटीसबोर्ड लवकरच तपशीलवार पत्रक लावण्यात येणार असून, या कार्यक्रमाला येण्यास इच्छुक असणाऱ्या लवकरात लवकर नावनोंदणी करण्याचे आवाहन गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि चतुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZMRCC
Similar Posts
‘अष्टरंगी मैत्र’ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रत्नागिरी : फ्रेंडशिप डे अर्थात मैत्रीदिनाचे मोठे आकर्षण तरुणांमध्ये असते. या पार्श्वभूमीवर, मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला चतुरंग प्रतिष्ठानने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘अष्टरंगी मैत्र’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी आठ क्षेत्रांतील मातब्बर मंडळींशी संवाद साधण्याची
‘गोगटे-जोगळेकर’ला पावणेदोन लाखांची पारितोषिके महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित रंगवैखरी या आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची महाअंतिम फेरी सहा जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडली. महाराष्ट्र आणि बेळगाव केंद्रातून विभागीय अंतिम फेरीत निवडून आलेल्या सात संघांचे नाट्याविष्कार या वेळी झाले
इंटरनेटमुळे संस्कृत पत्रकारिता बहरतेय रत्नागिरी : ‘संस्कृत ही पुरातन भाषा सध्या लोकव्यवहारातून मागे पडली असली, तरी इंटरनेटमुळे संस्कृतचे पुनरुज्जीवन होण्यास मोठा हातभार लागतो आहे. ऑनलाइन पोर्टल्स, वेबसाइट, टीव्ही चॅनेल्स, ऑनलाइन रेडिओ अशा विविध माध्यमांतून संस्कृत पत्रकारिता बहरू लागली आहे. सध्या देशभरात ११०हून अधिक संस्कृत नियतकालिके सुरू
अभिनेता अद्वैत दादरकर सहा जुलैला देवरुखात देवरुख (संगमेश्वर) : चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘मुक्तसंध्या’ या उपक्रमांतर्गत अभिरुची-देवरुख यांच्या सहकार्याने सुप्रसिद्ध युवा अभिनेता, दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सहा जुलैला संध्याकाळी सहा वाजता देवरुखातील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे होणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language